Parts of Speech (पार्टस् ऑफ स्पीच) शब्दांच्या जाती
कुठलीही भाषा शिकण्यासाठी, समजण्यासाठी तसेच त्या भाषेत योग्य प्रकारे स्वतःचे विचार व्यक्त करणे अगदी सहज आणि सोपे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते त्या भाषेचे व्याकरण. त्यामुळे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्रजीचे व्याकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
मराठी भाषिकांना इंग्रजी शिकणे सोपे व्हावे आणि त्यांना ते मराठी माध्यमातून शिकता यावे या हेतूने मी येथे मराठी माध्यमातून इंग्रजी व्याकरण देत आहे, जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहील आणि आपल्या भाषेत समजल्यामुळे त्याचा वापर करणे अधिक सोपे होईल.
इंग्रजी व्याकरणाच्या आकर्षक जगात आपले स्वागत आहे! आपल्या भाषेच्या केंद्रस्थानी एक मूलभूत संकल्पना आहे: उदाहरणांसह इंग्रजीतील शब्दांच्या जाती. संवादाचे हे बिल्डिंग ब्लॉक्स आपल्याला अर्थपूर्ण वाक्ये तयार करण्यात आणि आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करण्यात मदत करतात. तुम्ही विद्यार्थी असाल, लेखक असाल किंवा तुमची भाषा कौशल्ये सुधारू पाहणारे कोणी असाल, शब्दांच्या जातीचे आठ भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय आणि उपपद पाहू.
1. Noun नाम : (dog, city, happiness)
2. Pronounn सर्वनाम : (he, she, it)
3. Verb क्रियापद : (run, jump, think)
4. Adverb क्रियाविशेषण : (quickly, loudly, wisely)
5. Adjective विशेषण : (happy, blue, big)
6. Preposition शब्दयोगी अव्यय : (in, on, under)
7. Conjunction उभयान्वयी अव्यय : (and, but, or)
8. Interjection केवलप्रयोगी अव्यय : (Oh!, Wow!, Ouch!)
9. Article उपपद : (the, a, an)

Noun (नाऊन) नाम
Noun म्हणजे काय?
A word that refers to a person, place, thing, event, substance, or quality. एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी जो शब्द वापरतात, त्याला नाम असे म्हणतात. अशा प्रत्येक नावाला इंग्रजी व्याकरणांमध्ये Noun म्हणजेच नाम असे म्हणतात.
उदा. Vaibhav, Barshi, India, Ganaga, etc.
Functions of Noun (नामाचे कार्य)
नामाचे त्याच्या वाक्यातील स्थानावरून कार्य बदलते.
1) Subject of the Verb (क्रियापदाचा कर्ता): Rohit plays cricket. “Rohit” या कर्त्याला “plays” या क्रियापदाचा कर्ता म्हणतात.
2) Complement of the Subject (कर्त्याचे पूरक): She is a player. येथे “a player” हे नाम “She” या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत आहे, म्हणून त्याला कर्त्याचे पूरक असे म्हणतात.
3) Object of the Verb (क्रियापदाचे कर्म): I saw Sagar. येथे “saw” या क्रियापदाच्या नंतर “Sagar” हे नाम क्रियापदाचे कर्म म्हणून आले आहे.
4) Object of Preposition (शब्दयोगी अव्ययाचे कर्म): We are going to the movie. (movie is object of the preposition “to”) “to” या शब्दयोगी अव्ययानंतर आलेल्या “movie” या नामाला शब्दयोगी अव्ययाचे कर्म असे म्हणतात.
5) Noun as an Appositive (प्रतिनाम): Pruthvi, a handsome boy, is my elder son. येथे “a handsome boy” हे Pruthvi चे प्रतिनाम आहे.
प्रतिनाम म्हणजे एखाद्या नामासाठी पुन्हा एखाद्या पर्यायी नावाचा वापर करणे होय. काही प्रसंगी शब्दसमूह किंवा वाक्यसुद्धा अशा प्रकारचे कार्य करते.
इंग्रजी व्याकरणातील Noun ची विभागणी पुढीलप्रमाणे एकूण पाच प्रकारांमध्ये केलेली आहे.

१. Proper Noun – विशेषनाम
* एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थळाच्या ठेवलेल्या विशिष्ट नावाला विशेषनाम असे म्हणतात.
* कोणत्याही Proper Noun चे पहिले अक्षर हे नेहमी Capital असते.
* Proper Noun हे नेहमी Singular (एकवचनी) असते. ते कधीही Plural (अनेकवचनी) नसते.
Proper Noun ची उदाहरणे :
* व्यक्तींची नावे :
e.g. Vaibhav, Vikas, Ganesh, Sagar etc.
* पाळीव प्राण्यांची नावे :
e.g. Tommy, Moti, Bruno, Rani etc.
* खंड, देश, राज्य, वसाहती, प्रांत, शहरे, खेडी यांची नावे :
e.g. Asia, India, Maharashtra, Jawali, Solapur, Barshi, Kuslamb etc.
* नदी, सरोवर, धरण यांची नावे :
e.g. Bhima River, Nainital Lake, Koyana Dam etc.
* दिशा, उपदिशा, टेकड्या, डोंगर, पर्वत यांची नावे :
e.g. East, North-East, Ramling, Himalaya, Alps etc.
* ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा यांची नावे :
e.g. Moon, Sun, Jupiter, Venus, Milky Way, Rohini etc.
* महिन्यांची आणि वारांची नावे :
e.g. January, February, Monday, Tuesday etc.
* इमारती, बंगले, रस्त्यांची नावे :
e.g. Sun Orion Apartment, Chandratanu Niwas, Mahatram Gandhi Road etc.
* माणसांच्या आडनावाचे अनेकवचन :
माणसाच्या आडनावला Proper Noun म्हणतात. अपवाद म्हणून आडनावाच्या शेवटी S प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन केलेले असते, तेंव्हा त्याचा अर्थ “संपूर्ण कुटुंब” (Family) असा होतो. अशा अर्थाने जेंव्हा आडनाव लिहिले असते, तेंव्हा न विसरता The हे article वापरतात.
e.g. The Pawars, The Waghmares etc.
2. Common Noun – सामान्यनाम
एकाच गटातील प्रत्येक सदस्यासाठी जे एकच नाव वापरले जाते, त्याला सामान्यनाम असे म्हणतात.
उदा. Man, Woman, Book, Boy, Girl, River, Village, City, Window, Pen, Pencil इत्यादी
* प्रथम उल्लेख होणाऱ्या सामान्य नामाांपूर्वी a किंवा an हे उपपद वापरतात, परंतु पुन्हा उल्लेख झाल्यास the हे उपपद वापरतात. तसेच एखाद्या सामान्यनामाचे पुढील वाक्यात वर्णन आल्यास त्या सामान्यनामापूर्वी the हे उपपद वापरतात.
उदा. I read a book. (प्रथम उल्लेख) I read a book. The book was in English. (पुन्हा उल्लेख)
The book, which was in English is about English Grammar. (वर्णन)
3.Collective Noun – समूहवाचक नाम :
एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्याशब्दाने केला जातो त्यास समूहवाचक नाम असे म्हणतात.
उदा. Army, Band, Batch, Battalion, Chorus etc.
Collective Nouns and Abstract Nouns are also included in Common Nouns.
समूहवाचक नामे आणि भाववाचक नामे सुद्धा सामान्यनामात समाविष्ट केली जातात.
Some Collective Nouns :
- A flock of birds
- A herd of cattle
- A school of fish
- A pack of wolves
- A pride of lions
- A swarm of bees
- A gaggle of geese
- A choir of singers
- An orchestra of musicians
- A team of athletes
- A class of students
- A audience of spectators
- A jury of peers
- A fleet of ships
- A constellation of stars
- A bouquet of flowers
- A bundle of sticks
- A forest of trees
- A library of books
- A galaxy of stars
4. Material Noun – पदार्थवाचक नाम
ज्या मूळ पदार्थापासून विविध वस्तू किंवा पदार्थ बनवले जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येत मोजता येत नाहीत, अशा पदार्थाच्या नावास पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदा. Wood, Gold, Water, Cotton, Glass, Plastic, Iron, Sugar, Paper, Oil इत्यादी
* पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनी (Singular) वापरले जातात. Material Noun सोबत a / an वापरत नाहीत.
* जर Material Noun सोबत एखाद्या साधनाचा उपयोग केला असेल तर अशा साधनापूर्वी a / an हे उपपद वापरले जाते.
उदा. a plastic bag, a glass of water, a pot of sugar
5. Abstract Noun – भाववाचक नाम
ज्या गोष्टीांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळयाांनी पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. Love, Freedom, Happiness, Knowledge, Justice, Courage, Time, Beauty, Anger, Success.
Rules for Using Abstract Nouns:
1. Capitalization: सामान्यतः, भाववाचक नामांचे Capitalization केले जात नाही, जोपर्यंत ते वाक्याच्या सुरुवातीस येत नाहीत किंवा एखाद्या विशिष्ट नामाचा भाग नसतात.
2. Article: संदर्भानुसार भाववाचक नामांसोबत प्रत्यय (a, an, the) वापरले जाऊ शकतात किंवा त्यांशिवायही वापरले जाऊ शकतात.
उदा. Happiness is important.
The happiness of the crowd was transmitable.
3. (Singular / Plural) एकवचन/अनेकवचन: बहुतेक भाववाचक नामे न मोजता येणारी असतात आणि केवळ एकवचनी रूपात वापरली जातात. तथापि, काही नामे अनेक प्रकार किंवा घटना दर्शविण्यासाठी अनेकवचनी रूपात वापरली जाऊ शकतात.
उदा. Freedom is valuable. (singular)
The freedoms we enjoy. (plural)
4. As Subject or Objects कर्ता किंवा कर्म म्हणून: भाववाचक नामे वाक्यात कर्ता किंवा कर्म म्हणून कार्य करू शकतात.
उदा. Subject (कर्ता) : Knowledge empowers people.
Object (कर्म) : We seek justice in this case.
5. With Adjectives (विशेषणांसह): भाववाचक नामांना विशिष्टता किंवा जोर देण्यासाठी विशेषणांद्वारे सुधारित केले जाऊ शकते.
उदा. Unwavering courage, Fleeting happiness etc.
6. In Metaphors (रूपकांमध्ये): गुंतागुंतीच्या कल्पना अधिक संबंधित करण्यासाठी भाववाचक नामे अनेकदा रूपकांमध्ये वापरली जातात.
उदा. Time is money.
7. Verb Forms (क्रियापदाचे रूप): अनेक भाववाचक नामांची संबंधित क्रियापदे असतात.
उदा. Love (noun) and to love (verb)
Kinds of Abstract Noun:
1. Abstract Noun of Quality (गुणदर्शक भाववाचक नाम) : यांचा संबंध हा Adjective शी असतो. Adjective पासून तयार होणारी काही Abstract Nouns of Quality ची उदाहरणे :
- शेवटी ness हा प्रत्यय असलेली : Good + ness = Goodness, Hard + ness = Hardness, Sweet + ness = Sweetness etc.
- शेवटी th हा प्रत्यय असलेली : Long + th = Length, True + th = Truth, Young + th = Youth etc.
- शेवटी ty किंवा ry हा प्रत्यय असलेली : Poor+ ty = Poverty, Human + ty = Humanity, Brave + ry = Bravery, Slave + ry = Slavery etc.
2. Abstract Noun of State (स्थितिदर्शक भाववाचक नाम) : ही नामे वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या अवस्था म्हणजेच state दर्शवतात. तसेच ही नामे Common Noun ला प्रत्यय लावून तयार होतात.
- शेवटी hood प्रत्यय असलेली : Child+ hood = Childhood, Mother + hood = Motherhood, Brother + hood = Brotherhood etc.
- शेवटी ship हा प्रत्यय असलेली : Friend+ ship = Friendship, Owner + ship = Ownership, Champion + ship = Championship etc.
- शेवटी age हा प्रत्यय असलेली : Bond+ age = Bondage, Pilgrim + age = Pilgrimage, Mile + age = Mileage etc.
3. Abstract Noun of Action (कृतिदर्शक भाववाचक नाम) :
यांचा संबंध हा Verb शी असतो. Verb पासून तयार होणारी काही Abstract Nouns of Action ची उदाहरणे :
- शेवटी ment हा प्रत्यय असलेली : Govern+ ment = Government, Attach+ ment = Attachment, Treat + ment = Treatment etc.
- शेवटी sion किंवा tion हा प्रत्यय असलेली : Discuss + sion = Discussion, Admit + sion = Admission, Protect + tion = Protection, Examine + tion = Examination etc.
- शेवटी ce हा प्रत्यय असलेली : Choose + ce = Choice, Serve+ ce = Service, Defend + ce = Defence etc.
Pronouns (प्रोनाऊन्स) सर्वनामे
कधी कधी एका वाक्यामध्ये किंवा वाक्यसमुहामध्ये Noun चा वारंवार वापर करावा लागतो. अशा Noun च्या वारंवार वापरामुळे ते लिखाण/वाचन कंटाळवाणे वाटू शकते. म्हणून ते टाळण्यासाठी Noun ऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो, त्याला Pronoun (प्रोनाऊन) म्हणजेच सर्वनाम असे म्हणतात.
* Simple Sentence मध्ये Pronoun हे पहिल्या किंवा तिसऱ्या स्थानी वापरले जाते.
* Pronoun चे वर्गीकरण हे Case (विभक्ती) आणि Person (पुरुष) नुसार केले जाते.
* इंग्रजी व्याकरणात Noun किंवा Pronoun चा दुसऱ्या एखाद्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी त्यांच्या स्वरूपात काही बदल केला जातो. तो बदल दर्शविण्यासाठी Case (केस) म्हणजे विभक्ती ही संज्ञा वापरली जाते.
* Pronoun चे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
1. Personal Pronouns (पुरुषवाचक सर्वनामे): Refer to specific people or things. e.g. I, We, You, You, He, She, It, They
2. Possessive Pronouns (स्वामित्वदर्शक सर्वनामे) : Show ownership. e.g. my, mine, yours, his, hers, its, ours, theirs
3. Reflexive Pronouns (आत्मवाचक / कर्मवाचक सर्वनामे): Refer back to the subject of the sentence. e.g. myself, yourself, himself, herself, itself, ourselves, yourselves, themselves
4. Demonstrative Pronouns (दर्शक सर्वनामे) : Point to specific things. e.g. this, that, these, those
5. Interrogative Pronouns (प्रश्नार्थक सर्वनामे): Used to ask questions. e.g. who, whom, whose, which, what
6. Relative Pronouns (संबंधदर्शक सर्वनामे) : Connect a clause or phrase to a noun or pronoun. e.g. who, whom, whose, which, that
7. Indefinite Pronouns (अनिश्चिततादर्शी सर्वनामे): Refer to non-specific things or people. e.g. anyone, everyone, someone, nobody, all, some, any
8. Reciprocal Pronouns (परस्परसंबंधी सर्वनामे): Express mutual actions or relationships. e.g. each other, one another
Adjectives (ॲडजेक्टिव्हज) विशेषणे
Noun किंवा Pronoun बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
Kinds of Adjectives (विशेषणाचे प्रकार):
1. Adjectives of Quality (गुणदर्शक विशेषणे): या विशेषणामध्ये रंग, रूप, आकार, गुण, दोष, स्थिती यांचे वर्णन असते. e.g. black, beautiful, big, small, honest, loud, soft etc.
The delicious cake was devoured quickly at the party.
She wore a beautiful dress to the gala event.
The brave firefighter rushed into the burning building.
His clever solution impressed everyone in the meeting.
We enjoyed a peaceful afternoon in the garden.
2. Adjectives of Quantity (परिमाणदर्शक विशेषणे): संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी त्याचे प्रमाण दाखवणारा शब्द हा परिमाणदर्शक विशेषण असतो. शक्यतो अशी नामे एकवचनी पदार्थवाचक किंवा भाववाचक असतात. परिमाणदर्शक विशेषणानंतर येणारे नाम हे नेहमी एकवचनी असते. e.g. Many, Few, Several, Some, Numerous, Plenty, Ample, Enough, Scarce, Little
We have few options left for our summer vacation plans.
There are many reasons to consider learning a new language.
The chef added several spices to enhance the flavor of the dish.
I only need some sugar for this recipe, not the whole bag.
Plenty of time remains before the deadline, so don’t panic.
3. Adjectives of Number (संख्यावाचक विशेषणे): अनिश्चित व निश्चित संख्यादर्शक तसेच क्रमदर्शक विशेषणांना संख्यादर्शक विशेषणे म्हणतात. संख्यादर्शक विशेषण होण्यासाठी पुढे येणारे नामसुद्धा संख्येत मोजता येणारे असावे लागते.
Examples:
Cardinal Numbers: One, Two, Three, Ten, Hundred etc.
Ordinal Numbers: First, Second, Third, Tenth, Hundredth
Quantifiers: Many, Few, Several, Some, All
Multiplicative Numbers: Single, Double, Triple, Quadruple
Fractional Numbers: Half, Quarter, Third
Distributive Numbers: Each, Every, Either, Neither
Indefinite Numbers: Numerous, Various, Countless, Ample
The twins bought three identical sweaters.
My grandmother has several antique vases in her collection.
Few students scored perfect marks on the challenging exam.
All team members must attend the mandatory meeting tomorrow.
The chef prepared numerous dishes for the banquet.
4. Demonstrative Adjectives (डेमॉनस्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज) दर्शक विशेषणे: जाणीवपूर्वक एखादी व्यक्ति किंवा वस्तु दर्शविण्यासाठी जे विशेषण वापरले जाते, त्याला दर्शक विशेषण म्हणतात. e.g. this, these, that, those, such, a certain, certain, the same, anyohter, other, another etc.
This book on the table is my favorite novel.
Those clouds in the sky look like they might bring rain.
These flowers in the garden smell wonderful.
That car parked across the street belongs to my neighbor.
Are you interested in buying these fresh vegetables from the market?
5. Distributive Adjectives (डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हज) वितरणदर्शक विशेषणे: एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख एकमेवपणे किंवा स्वतंत्रपणे करणीसाठी जे विशेषण वापरले जाते, त्याला वितरणदर्शक विशेषण असे म्हणतात. दिलेल्या संख्येतील प्रत्येक घटकाचा उल्लेख विभाजक विशेषणातून होतो. या विशेषणानंतर लगेच येणारे नाम एकवचनी असते. अशा वाक्यातील क्रियापदे व सर्वनामे ही एकवचनी असतात. e.g. each, every, neither, either, any
Each student received a new textbook.
She checks her email every hour.
You can choose either option.
Neither candidate impressed the voters.
You can pick any color you like.
6. Interrogative Adjectives (इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हज) प्रश्नार्थक विशेषणे: what, which, whose चा वापर नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक विशेषणे होतात. what चा उपयोग सर्वसाधारण अर्थाने केला जातो, तर which चा उपयोग एखाद्या विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी केला जातो.
1. What recipe are you doing tonight?
2. Whose car is this?
3. Which book do you like the most?
7. Possessive Adjectives (पझेसिव्ह ॲडजेक्टिव्हज) स्वामित्वदर्शक विशेषणे: my, his, her, your, their, our, its चा वापर नामापूर्वी मालकी दाखविण्यासाठी केल्यास ती स्वामित्वदर्शक विशेषणे होतात.
My car is parked in the garage.
Her sister works as a teacher.
Their dog loves to play fetch in the park.
Our house needs a new coat of paint.
His artwork was displayed in the gallery.
Your opinion matters to me.
Its fur is soft and fluffy.
8. Emphasizing Adjectives (एम्फसाइजिंग ॲडजेक्टिव्हज) जोरदर्शक विशेषणे: own आणि very चा वापर नामापूर्वी केल्यास ती जोरदर्शक विशेषणे होतात.
1. This is the very dress that I like.
2. I gave it with my own hands. (जोर देण्यासाठी own चा वापर षष्ठीनंतर करतात.)
9. Exclamatory Adjectives (एक्सलमेटरी ॲडजेक्टिव्हज) उद्गारवाचक विशेषणे: what, such, how चा उपयोग उद्गारवाचक वाक्यात केल्यास ते उद्गारवाचक विशेषण होते.
What a beautiful day!
Such amazing talent!
How wonderful to see you!
10. Proper Adjectives (प्रॉपर ॲडजेक्टिव्हज) विशेषनामवाचक विशेषणे: Proper Noun पासून तयार होणाऱ्या विशेषणाला विशेषनामवाचक विशेषण म्हणतात. जेंव्हा एखादे Proper Noun वाक्यामध्ये स्वतंत्रपणे न वापरता दुसऱ्या एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरलेले असते, तेंव्हा त्याला Proper Adjective असे म्हणतात. हे विशेषनामवाचक विशेषण वाक्यामध्ये जसेच्या तसे न वापरता त्याला एखादा प्रत्यय लावून वापरतात. e.g. Indian (from India), American (from America), French (from France), Shakespearean (from Shakespeare), Victorian (from Queen Victoria), Newtonian (from Isaac Newton), Buddhist (from Buddha), Olympian (from Mount Olympus or the Olympic Games), Elizabethan (from Elizabeth I), Parisian (from Paris), Freudian (from Sigmund Freud) etc.
ही Proper Adjectives नेहमी Nationalities, Languages, Cultures, Historical periods, Philosophical or scientific theories, Religions याच्याशी निगडीत असतात.

Verbs (व्हर्ब्स) क्रियापदे
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय.
* क्रियापद हा असा शब्द आहे जो व्यक्त करतो :
१. Action (क्रिया) : run, jump, think
२. State (स्थिती) : be, have, belong
३. Occurence (घटना) : happen, occur, exist
४. Event (कार्यक्रम) : start, finisih, celebrate
५. Condition (स्थिती): seem, appear, feel
* वाक्य रचनेसाठी क्रियापदे आवश्यक असतात, काय घडत आहे, घडले आहे किंवा घडणार आहे हे सांगतात. इंग्रजी भाषेतील व्याकरणात Verb हे सामान्यतः दुसऱ्या स्थानावर वापरले जाते.
* Verb आपल्याला त्या वाक्यातील Subject म्हणजेच कर्त्याच्या Action (क्रिया), State (अवस्था), possession (मालकी) याची माहिती देते.
* वाक्यातील verb मुळे क्रिया कोणत्या काळात (Tense) मध्ये झाली आहे, होत आहे किंवा होणार आहे याचा अर्थबोध होतो.
* Action, State आणि Possession नुसार Verb ची तीन प्रकारामध्ये विभागणी होते.
१. To चे Verb (कृतीदर्शक क्रियापद): Subject च्या Action बद्दल माहिती मिळते. e.g. To run, To sing, To write, To dance, To laugh
२. To be चे Verb (स्थितीदर्शक क्रियापद): Subject च्या State बद्दल माहिती मिळते.
Am (first person singular, present tense): e.g. I am excited about the concert tonight. Usage: Expresses a current state or condition for “I”.
Is (third person singular, present tense): e.g. The sky is blue today. Usage: Describes a current state for singular nouns or pronouns (he, she, it).
Are (plural present tense and second person singular): e.g. You are my best friend. They are late for the meeting. Usage: Used for plural subjects or “you” in present tense.
Was (first and third person singular, past tense): e.g. I was nervous before the presentation. She was a talented musician. Usage: Expresses a past state for singular subjects.
Were (plural past tense and second person singular): e.g. We were surprised by the news. You were right about the solution. Usage: Used for plural subjects or “you” in past tense.
Be (infinitive and imperative): e.g. I want to be a doctor when I grow up. Be quiet in the library. Usage: Expresses a desired state or gives a command.
Being (present participle): e.g. He is being very helpful today. Usage: Often used in continuous tenses or as a gerund.
Been (past participle): e.g. She has been to Paris three times. Usage: Used in perfect tenses to indicate completed actions.
ही क्रियापदे इंग्रजीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते विविध काळ (tense) तयार करण्यास आणि अस्तित्वाची स्थिती व्यक्त करण्यास मदत करतात. ते irregular आहेत, म्हणजेच ते typical verb form पद्धतींचे अनुसरण करत नाही, म्हणूनच त्यांना नेहमी वेगळ्या list मध्ये गणले जाते आणि इंग्रजी शिकताना त्यांना special attention देण्याची गरज असते.
३. To have चे Verb (स्वामित्वदर्शक क्रियापद): Subject च्या Possession बद्दल माहिती मिळते. e.g. Have, Has, Had, Having
यांचा उपयोग :
- मालकी दाखवण्यासाठी: I have a car.
- अनुभव सांगण्यासाठी: She has traveled widely.
- नातेसंबंध सांगण्यासाठी: They have two children.
- Perfect Tenses तयार करण्यासाठी: We have finished the project.
- Obligations (दायित्व) सांगण्यासाठी: I have to study tonight.
काही उदाहरणे:
- Have (base form, used with I/you/we/they): I have an appointment at 3 PM. They have interesting hobbies.
- Has (third person singular, present tense): He has a great sense of humor. The dog has a red collar.
- Had (past tense for all persons): We had a wonderful time at the party. She had already left when I arrived.
- Having (present participle): Having completed the task, we took a break. He is having trouble with the new software.
To have चा वापर main verb (expressing possession or experiences) आणि auxiliary verb (helping to form perfect tenses) म्हणूनही केला जातो.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.